जितेंद्र आव्हाड (Photo Credits-Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नेते आणि महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज ठाणे (Thane) येथे आयोजित केलेल्या एका सभेत CAA वरून केंद्र सरकारला टोलावत अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडत असताना आव्हाड यांनी पून्हा एकदा अप्रत्यक्ष विधान करत "जब तेरा बाप अंग्रेजो के तलवे चाट रहा था, तब मेरा बाप फांसी के तख्त को चुम के इन्कलाब झिंदाबाद के नारे दे रहा था"असे म्हंटले आहे. या भाषणाचा एक व्हिडीओ सध्या ANI या वृत्तसंस्थेच्या मार्फत शेअर करण्यात आला आहे, तसेच हाच व्हिडीओ आव्हाड यांनी स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत "फिरंगीयों के एजंट की हद है, इस घर के मालिक को किसकी जमीन है पुछते है" असे म्हणत आपण #CAA..NRC..NPR याच्या विरुद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. वास्तविक, या कवितेत आव्हाड यांनी कोणाचेही प्रत्यक्ष नाव घेतले नसले तरी त्यांचा निशाणा कोणाकडे आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल.

जितेंद्र आव्हाड यांनी या भाषणात दिल्लीच्या तख्त्रावर बसलेल्या म्हणजेच केंद्र सरकारला संबोधून हे विधान केले आहे, तुम्ही आम्हाला आमच्या देशवासी असण्याचे दाखले मागता असे म्हणताना त्यांनी अप्रत्यक्षपणे CAA ला विरोध दर्शवला आहे, तर पुढे वीर सावरकर यांच्या माफी वरून तसेच भगतसिंह यांच्या इन्कलाब झिंदाबाद घोषणेचे दाखले देत त्यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत भडकले; म्हणाले...

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

दरम्यान, आव्हाड यांनी जरी भाजप प्रणित केंद्र सरकारला उद्देशून हे विधान केले असले तरी सध्या महाराष्ट्रात शिवसेनेसोबत मिळून राष्ट्रवादीने सरकार स्थापले आहे. शिवसेनेची सावरकर यांच्याप्रतीची भूमिका पाहता या विधानाचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार का पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वीर सावरकर यांच्याविरोधी बोलणाऱ्यांची मते ही वैयक्तिक आहेत असे म्हंटले होते मात्र ज्यांना हा विरोध करावासा वाटतो त्यांनी निदान दोन दिवस अंदमानच्या जेल मध्ये शिक्षा भोगून पाहावे असे देखील राऊत यांनी म्हंटले होते.