व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जालना (Jalna) येथील वनविभाग रोडवर घडली. संबधित व्यापारी काही दिवसांपूर्वी वनविभाग रोड परिसरात मॉर्निग वॉकला गेले असताना अज्ञात दुचाकीस्वरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. सुदैवाने, यात व्यापाऱ्याला मोठी इजा झाली नाही. त्यानंतर व्यापाराला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले. व्यापाऱ्याने या संदर्भात सर्व माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षकांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच आरोपींना अटक करण्यात आली.
सोमनाथ उर्फ पप्पू गायकवाड असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याने व्यापारी विमलराज सिंघवी हे काही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना वनविभाग रोडवर सोमनाथ याने त्यांच्या मित्रासह येऊन विमलराज यांच्यावर गावठी बुंदुकीने गोळीबार केला. त्यानंतर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या इतर लोकांनी त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने, विमलराज यांचा जीव थोडक्यात बचावला. यानंतर या घटनेची पूर्ण माहिती विमलराज यांनी चौकशीसाठी आलेल्या पोलिसांना दिली. पोलिसांनी वेळ न घालवता आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसातच पोलिसांनी मुख्य आरोपी सोमनाथ यांच्यासह तिघांना अटक केली आहे. हे देखील वाचा-मुंबई: ग्रांट रोड येथे ट्रकच्या धडकेत 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू; वाहनचालक पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा जालन्यातील सोमनाथने केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार सोमनाथला ताब्यात घेतले असता त्याने तीन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि 8 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.