मुंबई: ग्रांट रोड येथे ट्रकच्या धडकेत 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू; वाहनचालक पोलिसांच्या ताब्यात
Image used for Representational Purpose | (Photo Credits: ANI)

रस्ता ओलांडत असताना ट्रकच्या धडकेत 70 एका वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना मुंबईतील (Mumbai) ग्रांड रोड (Grant Road) येथे बुधवारी सकाळी 10 च्या सुमरास घडली. पोलिसांनी ट्रक चाहकाला अटक केली असून त्याच्यावर गु्न्हा नोंदवण्यात आला आहे. यात कोणाची चूकी आहे? याचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक चौकशी करत आहे. यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज देखील घेतले आहेत.

रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जातात. यातच मुंबई येथील ग्रॅंड रोड येथे एका ट्रकचालकाने एका वृद्ध महिलेला धडक दिली. दरम्यान, वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी संबधित महिलेला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. परंतु, या महिलेचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केले. यामुळे गामदेवी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. तसेच याप्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत आहेत.चंचल रतिलाल सावळा असे या घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव असून गामादेवी परिसरात राहत होती. हे देखील वाचा- नाशिक: भरधाव वेगाने आलेल्या वाहनाची धडक लागून बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार गौडा असे आरोपीचे नाव आहे. राजकुमार निष्काळजीपणाने वाहन चालवल्यामुळे त्याच्यावर मोटार वाहन कायदाच्या गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेट आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.