Malls | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

राज्यातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झाल्याने आजपासून मॉल्स (Malls) सुरु करण्यात परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या नियमांत आज अजून एका नियमाची भर पडली आहे. 18 वर्षांखालील मुला-मुलींनी मॉलमध्ये प्रवेशासाठी ओळखपत्रं दाखवणे बंधनकारक असणार आहे, असे आदेश राज्य सरकारने आज जारी केले आहेत. (Maharashtra: खरेदीसाठी शॉपिंग मॉलमध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या लसीकरणाच्या अटीला दुकान मालकांचा विरोध)

राज्यात 18 वर्षांखालील मुला-मुलींचे लसीकरण अद्याप सुरु झाले नसल्याने त्या मुलांना मॉलमध्ये प्रवेश करताना वयाचा पुरावा सादर करावा लागणार आहे. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा-महाविद्यालयाचं ओळखपत्र दाखवणे मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखवणे बंधनकारक असणार आहे.

ANI Tweet:

केवळ कोविड-19 लसीकरण पूर्ण झालेल्यांसाठी मॉल्स खुले असणार आहेत. सर्व मॉल्स रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहणार असून मॉलमध्ये जाणाऱ्या व्यक्तींना लसीकरण सर्टिफिकेट सोबत बाळगणे आवश्यक असणार आहे. तसंच त्यासोबत वैध ओळखपत्र असणे देखील महत्त्वाचं आहे.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट थंडावत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यासंबंधिचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. नियम न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊनचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.