पुण्यातील आघाडीचे व्यावसायिक व सिंहगड इन्स्टिट्यूटचे (Sinhgad Institute) अध्यक्ष मारुती नवले (Maruti Navale), यांच्या अडचणीत पुन्हा फार मोठी वाढ झाली आहे. बेकायदा रक्कम जवळ बाळगल्या प्रकरणी, तसेच कर चुकवल्या कारणाने आयकर विभागाने (Income Tax) त्यांच्यावर 6 खटले दाखल केले आहेत.आयकर विभागाचे उपायुक्त आदित्य राय यांनी हे खटले दाखल केले आहेत. जुलै 2017 मध्ये नवले यांच्या घरावर कर विभागाने धाड टाकली होती. त्यावेळी त्यांनी सिंहगड टेक्नीकल एज्युकेशन सोसायटीचा 45 कोटी रुपयांचा कर चुकवल्याचे निदर्शनास आले होते.
त्यानंतर 25 जुलै 2017 रोजी आयकर विभागाने नवले यांच्या संबंधित असलेल्या, नीमको ट्रेडर्स लि., नीमको स्पीनर्स लि, नीमको हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स लि. नीमको अॅडव्हर्टायजिंग अँड एन्टरटेनमेंट लि. नीमको इन्वेस्टमेंट अँड फायनान्स लि., जय श्रीराम सुगर अँड अग्रो प्रॉडक्ट्स लि.,आनंद को ऑपरेटिव्ह बँक तसेच कर्वे रोड येथील घर अशा कार्यालयांवर धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी अनेक महत्वाची कागदपत्रे, कॅश ताब्यात घेण्यात आली होती. (हेही वाचा: चित्रपट निर्माते फिरोज नादियादवाला यांनी कर चुकवल्यामुळे तुरुंगवासाची शिक्षा)
या धाडीमध्ये वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांमध्ये कोट्यावधी रुपयांचे व्यवहार केल्याचे समोर आले. या कोणत्याही व्यवहाराचा कर भरला गेला नव्हता. तसेच ही रक्कम कुठून आली याबाबतही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तसेच नवले यांनी अशा अनेक लोकांकडून कर्जे घेतली आहेत ज्यांच्याकडे पॅन नंबर नाहीत. 2015-16 कालावधीमध्ये सर्वात जास्त म्हणजे 141 कोटी रुपयांचे कर्ज घेतले गेले आहे. तर अशा प्रकारे पैशांचे गैरव्यवहार केल्याप्रकरणी हे 6 खटले दाखल केले गेले आहेत.