चित्रपट निर्माते फिरोज नादियादवाला यांनी कर चुकवल्यामुळे तुरुंगवासाची शिक्षा
Firoz Nadiadwala (Photo Credits-Twitter)

चित्रपट निर्माते फिरोज नादियादवाला (Firoz A. Nadiadwala) यांनी कर चुकवल्याप्रकरणी बॅलर्ड पियर इस्टेट कोर्टाने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तर नादियादवाला यांनी 8.56 लाख रुपयांचा कर चुकविला आहे. आयकर विभागाने लागू केलेल्या नव्या नियमानुसार त्यांनी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

परंतु नादियादवाला हे न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सेशन्स कोर्टात अपील दाखल करणार आहेत. 2009-10 रोजी त्यांनी टीडीएस कर भरला नाही. त्यानंतर नादियादवाला यांना वारंवार नोटीससुद्धा पाठवण्यात आल्या होत्या. मात्र या नोटींसांना त्यांना काही उत्तर दिले नाही. त्यामुळे 2014 रोजी आयकर कमिशनर्स यांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली होती.(PM Narendra Modi Biopic: सुप्रीम कोर्टाने फेटाळली निर्मात्यांची याचिका; 19 मे नंतर होणार प्रदर्शित)

मात्र 2009-10 मध्ये एकाही नव्या चित्रपटाची निर्मिती न केल्याचे नादियादवाला यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे कर भरण्यासाठी उशिर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या खटल्यात विशेष सरकारी वकील अमित मुंडे यांनी नादियादवाला यांच्यावर कर चुकविल्यामुळे अजून एक खटला सुरु असल्याची माहिती दिली आहे.