अंबरनाथ: चार्जिंगला लावलेल्या IPhone 6 चा स्फोट, तरुणाचे दोन्ही पाय भाजले
i-phone-6 | (Photo Credit: Wikimedia Commons)

IPhone 6 blast: ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ (Ambernath) येथील कोहोजगार गाव परिसरात झालेल्या IPhone 6 या स्मार्टफोनचा स्फेट झाल्याने एक तरुण जखमी झाला. अमित भंडारी असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण गेल्या वर्षभरापासून आयफोन 6 हा स्मार्टफोन वापरत होता. या घटनेत अमितच्या दोन्ही पायांना जखमा झाल्या आहेत. ही घटना रविवारी (12 एप्रिल 2019) रोजी रात्री घडली.

प्राप्त माहितीनुसार अमित भंडारी या युवकाने आपला IPhone 6 हा स्मार्टफोन चार्जिंगला लावला होता. मोबाईलचे चार्जिंग सुरु असताना आलेला मसेज वाचत असताना हा स्फोट झाल्याचे अमित भंडारी या तरुणाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आपण नेहमीप्रमाणे मोबाईल चार्जिगला लावला होता. दरम्यान, अचानकच हा स्फोट झाल्याचेही अमितने सांगितले.

अधिक माहिती देताना अमितने सांगितले की, मोबाईलचा स्फोट होताच आपण तातडीने मोबाईल बाजूला फेकला. हा मोबाईल जवळच्या गादीवर पडला. ही गादी कापसाची असल्याने त्यातील कापसालाही आग लागली. यात आपले दोन्ही पाय भाजल्याचे अमितनसे सांगितले. (हेही वाचा, नांदेड: गेम खेळताना मोबाईलचा स्फोट; आठ वर्षांच्या मुलाने गमावला हात)

दरम्यान, या प्रकाराबद्दल आपण अॅपल कंपनीकडे तक्रार करणार असल्याचे अमित भंडारी या पीडित तरुणाने म्हटले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत मोबाईल स्फोटाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी मोबाईल वापरताना काळझी घ्यावी, असे तज्ज्ञ अवाहन करत आहेत.