भाजप, काँग्रेस (संग्रहित प्रतिमा)

राज्यासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूचे संकट असताना केंद्र सरकारने महाराष्ट्राला (Maharashtra) मोठा झटका दिला आहे. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (International Financial Service centrer) गुजरातलाआं (Gujrat) हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षात चांगलीच जुंपली आहे. यातच महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या ट्विटर हॅंडलवरून भाजपवर टीकेचा वर्षाव केला आहे. डॉ. मनमोहन सिंह यांनी मुंबई येथे आंतराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मात्र ती जागा मोदी सरकारने बुलेट ट्रेनला दिली. यावर भाजप नेते गप का? महाराष्ट्राशी ही गद्दारी का? असा सवाल काँग्रेसने ट्विटरच्या माधम्यातून विचारला आहे.

आंतरराष्ट्रीय सेवा केंद्रामुळे आर्थिक क्षेत्रात थेट 1 लाख नव्या नोकऱ्यांच्या संधी तयार होणार होत्या. तसेच याच्याशी संबंधित अप्रत्यक्ष आणखी 1 लाख नोकऱ्यांचीही संधी तयार होईल, असाही अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. आता हे आर्थिक केंद्रच गुजरातमध्ये हलवण्यात आल्याने महाराष्ट्रातील या नव्या नोकऱ्यांच्या संधीवरही पाणी फिरले आहे. आज जे लोक गळे काढून ओरडत आहेत, ते 2007 ते 2014 या काळात सत्तेत होते आणि त्यांनी मुंबईच्या आयएफएससीसाठी शून्य योगदान दिले. त्या संधीचा गुजरातने त्यावेळी फायदा घेतला, अशा आशायाचे ट्वीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यानंतर महाराष्ट्र कॉंग्रेसने ट्वीटरच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. दरम्यान, काँग्रेसने टीटरच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजपच्या कामाची विभागणी केली आहे. हे देखील वाचा- Lockdown: 'मी दारुचे गुत्ते सुरु करा असे नव्हते म्हटले', शिवसेनेच्या टिकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे उत्तर

महाराष्ट्राचे काँग्रेसचे ट्विट-

याआधी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपर निशाणा साधला होता. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमधील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र येथे सुरु न करता ते गुजरातला नेणे हा मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी भ्रम पसरवण्याचा विरोधकांकडून प्रयत्न सुरु आहे, असे ते म्हणाले होते.