Road Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

बीडमधील (Beed) केज-अंबाजोगाई महामार्गावर इनोव्हा आणि रिक्षाचा भीषण अपघात (Innova And Rickshaw Crash) झाला असून त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा अपघात के ज-अंबाजोगाई रस्त्यावर सायंकाळी 4 च्या सुमारास घडला. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चेंदामेंदा झाला असून ईनोव्हा कार रिक्षाला धडकून रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. या घटनेत 9 जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंजानक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

या अपघातात रिक्षा चालक बालाजी संपत्ती मुंडे (वय 28), मच्छिंद्रसिंग चरणसिंग बोके (वय 35), प्रिया दीपक सिंग (वय 2) व युवराज सिंग (वय 1) या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील मंदा चिखलकर, रिक्षातील आलम सिंग टाक, हरजित सिंग बादल व दीपक सिंग डोके यांच्यासह अन्य पाच जण या दुर्घटनेत जखमी झाले आहे. (हे देखील वाचा: आता ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित अनेक सेवा मिळणार ऑनलाइन, RTO मध्ये जाण्याची गरज नाही, जाणून घ्या सविस्तर)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इनोव्हा आणि रिक्षा या दोन वाहनांची केज-अंबाजोगाई रस्त्यावर समोरासमोर धडक झाली. तालुक्यातील केज-अंबाजोगाई रस्त्यावर होळपासून एक किमी अंतरावर भरधाव वेगात असलेल्या मोटारीने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. रिक्षाही केजकडून (ङं्र्न) अंबाजोगाईच्या दिशेने जात होती. तर कार अंबाजोगाईकडून केजच्या दिशेने येत होती. अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या व जखमींच्या नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी केली होती.