राज्यासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूचे (Coronavirus) संकट वावरत असताना परभणीकरांना (Parbhani) दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. परभरणीत गेल्या काही दिवसांपूर्वी एका तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे परभणीकरांची चिंता वाढली होती. मात्र, 10 दिवसांतच त्या तरूण रुग्णांची प्रकृती स्थिर राहिल्याने व पाठोपाठ तिसरा स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनात आनंदची लहर उमटली आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला हादरुन टाकले आहेत. कोरोनाची लागण होऊन आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 30 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे.
पुणे शहरात कारागीर म्हणून काम करणारा एक युवक 11 एप्रिल रोजी छुप्या मार्गाने मोटार सायकलद्वारे परभणीत दाखल झाला होता. दोन दिवसांनंतर त्यास सर्दी, ताप व खोकला असल्याने 14 एप्रिल रोजी त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तपासणीनंतर त्याचा स्वॅब प्रयोगशाळेस पाठविला होता. त्याचा अहवाल 16 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजून 26 मिनिटांनी प्राप्त झाला. तेव्हा तो कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ही वार्ता लगेचच सर्वदूर पसरली अन् परभणी शहरासह जिल्हावासियांत चिंतेचे, भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, संबंधिक कोरोनाबाधित रुग्णाचा तिसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. हे देखील वाचा- राज्यातील सरकारी, महापालिका रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी चाचणी, उपचार व जेवणाची सुविधा मोफत, राज्य सरकारचा निर्णय
जगभरात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 30 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 3 लाखांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 28 हजार 380 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 886 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 6 हजार 362 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.