Indurikar Maharaj (Photo Credits: Facebook)

अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार इंदोरिकर महाराज यांना त्यांनी एका किर्तनात गर्भलिंगाच्या ऑड इव्हन फॉर्म्युल्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यानुसार इंदोरीकरांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच PCPNDT समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटिस धाडली होती. त्या नोटिसला लेखी उत्तर सुद्धा दिले. त्यानंतर आता इंदोरिकर महाराजांना गर्भलिंगाच्या ऑड इव्हन फॉर्म्युल्याबाबतच्या वादग्रस्त विधानावर दिलासा दिला आहे. तसेच सायबर सेलकडून कारवाई करण्यात येणार नसल्याचा निर्णय सुनावण्यात आला आहे. कारण इंदोरिकर महाराजांचा व्हिडिओ युट्युबरुन काढून टाकण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

इंदोरीकरमहाराजांनी ओझर येथे झालेल्या किर्तनात 'सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा जन्मास येईल आणि विषम तारखेला स्त्री संग केल्यास मुलगी होते', असं वादग्रस्त वक्तव्य केलं होते. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप हे मला अमान्य आहेत. तसेच असे वादग्रस्त विधान मी कुठेच बोललो नसल्याचा खुलासा त्यांनी केला होता. इंदोरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर युट्युबरुन काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळेच इंदोरीकरांच्या विरोधात कोणताही पुरावा सायबर सेलला मिळाला नाही. तर पुरेसे पुरावे नसल्याने ही सायबर सेलने म्हटले आहे.(गर्भलिंग निदानाच्या 'ऑड-इव्हन फॉर्म्युला'बाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन इंदोरीकर महाराजांची पलटी, असे बोललो नसल्याचा खुलासा)

जानेवारी ते फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान कोणतेही किर्तन केले नसल्याचे इंदोरिकरांनी म्हटले होते. परंतु जिल्हा चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी यावर अधिक स्पष्टीकरण देत इंदोरीकर महाराजांनी काय लेखी उत्तर दिले आहे याबाबत सांगितले होते. त्यांनी असे म्हटले  की, इंदोरीकर महाराजांनी ते समाजप्रबोधनाचे काम करत असल्याचे म्हटले होते. तसेच किर्तनाच्या कोणत्याही क्लिप आम्ही सोशल मीडियात पोस्ट करत नाही. परंतु इंदोरीकर यांनी खुलासा करताना जे स्पष्टीकर दिले आहे ते खरेच किर्तनात नसेल तर ती गोष्ट समाधानकारक असल्याचे मुरंबीकर यांनी म्हटले होते.