Indian language In US: अमेरिकेत सरकारी वेबसाईट झळकणार आता भारतीय भाषांमध्ये; हिंदी, गुजराती आणि पंजबी भाषेत होणार अनुवाद
Indian language | Representational Image (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेतील सरकारी वेबसाईट आता भारतीय भाषांमध्येही झळकरणार आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रपति आयोग (US Prez Commission) व्हाइट हाउस (White House) आणि इतरही संघीय संस्थांची संकेतस्थळे (Website) एशियाई-अमेरिकी तथा प्रशांत महासागर क्षेत्रातील लोकांद्वारे बोलल्या जाणाऱ्या भाषेत अनुवादित करण्याची शिफारस केली आहे. या भाषांमध्ये हिंदी, गुजराती आणि पंजाबी भाषांचा समावेश आहे. 'प्रेसीडेंट्स एडवायजरी कमीशन ऑन एशियन अमेरिकान्स' (AA) , नेटीव्ह हवाइयन्स अँड पॅसिफीक आयसलँडर्स (NHPI) या भषांमध्ये सहभागी करण्याबाबतच्या शिफारशिंना नुकतीच मंजूरी देण्यात आली होती.

आयोगाच्या इस महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या एका बैठकीत सूचना दिली होती की, संघीय एजन्सीच्या आपल्या वेबसाईट्सवर उपलब्ध दस्ताऐवज, डिजिटल सामग्री आणि आवेदन 'AA' तथा ‘एनएचपीआई' द्वारा बोलल्या जाणाऱ्या बआषेत उपलब्ध करायला हवे. बैठकीत अशीही सूचना देण्यात आली होती की, लोक एवं अपत्कालीन इशाराही अशा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. ज्यांना इंग्रजी भाषा फारशी समजत नाही. यात अशीही सूचना करण्यात आली होती की, आपत्ती किंवा आपत्कालीन स्थितीत राबविले जाणारे अभियान, माहिती, नीति निर्माण, प्रतिक्रिया प्रबंधन एवं अन्य योजाना याचीही माहिती इंग्रजी लिहीता, बोलता न येणाऱ्या नागरिकांनाही समजली पाहिजे. (हेही वाचा, भारतीय भाषा शिकून घेण्याच्या ॲपसाठी MyGov कडून Innovation Challenge; 27 मे पर्यंत करू शकता अर्ज)

आयोगाने घेतलेला निर्णय राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना पाठविण्यात आला आहे. त्यावर ते निर्णय घेतील अशी आपेक्षा आहे. असेही नाही की ही सूचना अशीच अचानक दिली आहे. ही एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. ज्यात भारतीय-अमेरिकी अजय जैन भूटोरिया यांनी डेमोक्रेटीक पार्टीचे उमेदवार राहिलेले बायडून यांच्यासाठी राष्ट्रपती निवडणुकीवेळी अनेक भाषांमध्ये प्रचार केला होता आणि बायडेन जिंकले होते. या निवडणुकीत हिंदी, गुजराती, पंजाबी आणि तेलुगु भाषांमध्ये करण्यात आलेल्या प्रचाराचा एका मोठ्या वर्गार मोठा प्रभाव पडला होता.