Assembly Election 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 समोर असताना अनेक पक्षांकडून विरोधी पक्षांवर आरोप-प्रत्यारोप केली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (National Congress Party) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेत भाजपवर (BJP) आरोप केले आहेत. पुलवामासारखा हल्ला (Pulwama Attack) आणखी एक हल्ला महाराष्ट्रातील (Maharastra) लोकांची दिशाभूल करु शकतो, असे त्यांनी विधान केले आहे. तसेच पवार यांनी लोकसभा निवडणूक 2019 मधील काही मुद्दे उपस्थित केले आहेत.
शरद पवार यांची शुक्रवारी औरंगाबाद येथे सभा पार पडली आहे. या सभेत पवार यांनी भाजप पक्षाला टोकावर धरले आहे. या दरम्यान, शरद पवार म्हणाले की, "लोकसभा निवडणूक 2019 पार पडण्याअगोदर नरेंद्र मोदी यांच्याबदल लोकांचा मनात नाराजी निर्माण झाली होती. परंतु, पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याने ही परिस्थिती बदलून टाकली होती. तसेच आताही महाराष्ट्रातील लोकांची मन विचलित करण्यासाठी आणखी एक पुलवामा हल्ला घडू शकतो," असे विधान शरद पवार यांनी केले आहे. हे देखील वाचा-Maharashtra Assembly Elections 2019: भाजप सोबत युती करणार, पुढील दोन दिवसात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार- उद्धव ठाकरे
पुलवामा हल्ल्यात सीआरएफचे एकूण 40 जवान शहीद झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यासभेत हा विषय मांडला होता. भाजपचे सरकारकडून जुन्या गोष्टींवर माती टाकण्यासाठी नवीन घटना घडवली जाते, असे राज ठाकरे यांनी अनेकदा त्यांच्या सभेतून म्हणाले होते.