Maharashtra Assembly Elections 2019: भाजप सोबत युती करणार, पुढील दोन दिवसात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis (Photo Credits-Facebook)

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी9 Assembly Elections)  राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना (BJP-Shiv Sena) युतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे( Uddhav Thackeray) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत युती करणार असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत पुढील दोन दिवसात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

यापूर्वी भाजप-शिवसेना युतीबाबत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता त्यावेळी दोघांना 135-134 जागा मिळणार असल्याचे ठरवण्यात आले होते. तसेच शिवसेनेने फडणवीस सरकारला गेल्या 5 वर्षांपासून साथ दिली आहे. त्याचसोबत लोकसभा निवडणूकी वेळी झालेली युती विधानसभा निवडणूकीला होणार असल्याचे म्हटले होते. आज उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या एका बैठकीत विधानसभा निवडणूकीची रणनिती कशी असणार याबाबत सुद्धा चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुरुवारी शिवसेनेतील खासदार संजय राउत यांनी महाराष्ट्र विधानसभेत पक्षाला 144 जागा न दिल्यास भाजप सोबत युती तोडणार असल्याचे म्हटले होते. त्याचसोबत अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दोन्ही पक्षाला 50-50 जागा वाटप होणार असल्याचे म्हटले होते.(Maharashtra Assembly Elections 2019: भाजपकडून 126-162 महायुतीचा फॉर्म्युला सेट? शिवसेना राजी! - सूत्र)

सुत्रांच्या मते भाजपकडून शिवसेनेला फक्त 120 पेक्षा अधिक जागा देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी 288 जागा आहेत. यामधील 44 जागा त्यांच्यासोबत असलेल्या अन्य पक्षासाठी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे राहिलेल्या 244 जागांसाठी भाजप-शिवसेनेत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाणार आहे.