IND vs AUS Boxing Day Test 2020: यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) संघाविरुद्ध मेलबर्नमध्ये दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) दमदार विजयानंतर सर्वत्र खेळाडूंचे कौतुक केले जात आहे विशेषतः प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेचे (Ajinkya Rahane) ज्याने पुढाकार घेत संघाचे नेतृत्व केले आणि टीमच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. कर्णधार म्हणून रहाणेचा हा सलग तिसरा विजय ठरला. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील रहाणेच्या नेतृत्वातील भारतीय संघाचे विजयाबद्दल अभिनंदन केले. अॅडिलेड ओव्हलमधील (Adelaide Oval) पहिल्या सामन्यातील पराभवांनंतर भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी करत ऑस्ट्रेलियावर पहिल्या दिवसापासून वर्चस्व गाजवले आणि अखेरपर्यंत कांगारू संघाला वरचढ होण्याची संधीच दिली नाही. दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) नेहमीचीच क्रीडापटूंचे अभिनंदन करण्यात अग्रणी असतात आणि टीम इंडियाच्या विजयानंतर त्यांनीही खास ट्विट करत संघाला शुभेच्छा दिल्या. (IND vs AUS 2nd Test 2020: मेलबर्नमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ; विराट कोहली, वसीम जाफरसह सोशल मीडियावर आल्या अशा प्रतिक्रिया)
“कर्णधार अजिंक्य रहाणेने शानदार खेळीएन टीम इंडियाचा बॉक्सिंग डे कसोटीतील विजय, टीम इंडियाचे हार्दिक अभिनंदन!”, असे ट्विट करत त्यांनी संघातील सर्वांचे कौतुक केले. आदित्य यांना वगळता सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यापासून अन्य माजी खेळाडू देखील टीम इंडियाच्या कामगिरीवर खुश झाले आणि सामना संपल्यावर संघावर कौतुकाचा वर्षाव केला. पहा आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया:
A Boxing Day Test win to Team India captained by the fine knock of @ajinkyarahane88 ! Heartiest congratulations Team India!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 29, 2020
दरम्यान, अॅडिलेडमधील पहिल्या टेस्टमध्ये भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागा होता. सामन्याच्या दुसऱ्या डावात भारत फक्त 36 धावांच करू शकला जी टेस्ट क्रिकेट इतिहासातील संघाची निचांकी धावसंख्या ठरली. या पराभवानंतर भारताने केलेल्या पुनरागमनाचं सगळीकडूनच कौतुक होतं आहे. रहाणेचं शतक, रविंद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी तसेच नवोदित मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि अनुभवी आर अश्विनची भेदक बॉलिंग ही टीम इंडियाच्या विजयाची प्रमुख कारणं ठरली. तसंच आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या शुभमन गिल यानेही छाप पाडली. शिवाय, रहाणेला त्याच्या शतकी खेळीसाठी मॅन ऑफ द मॅचने गौरवण्यात आलं.