NDRF | Representational Image | (Photo Credits: File Photo)

पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथे नुकत्याच आलेल्या ऍम्फान या चक्रीवादळातून देश सावरत असतानाच आता आणखी एक चक्रीवादळ हे धडकणार आहे. बंगालच्या उपसागरानंतर देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रात (Arabian Sea) हे चक्रीवादळ वादळ घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) रविवारी 31 मे रोजी याबाबत पुष्टी केली होती. अरबी समुद्र आणि लक्षद्वीप दरम्यान कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. यामुळे येत्या 2-3 दिवसात महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातच्या किनारी सीमेवर चक्रीवादळ (Cyclone) निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत- 3, पालघर- 2, ठाणे, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग येथे प्रत्येकी एक अशा महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (National Disaster Response Force) एकूण 9 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

कोरोना संकटाशी झुंज देत असलेल्या महाराष्ट्र आणि गुजरातला आता चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा भयंकर अशा चक्रीवादळात बदलू शकतो. यामुळे आता मुंबईला जास्त फटका बसण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली होती. 3 जूनला नार्थ महाराष्ट्र आणि साऊथ गुजराज किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मुंबईसह, ठाणे, पनवेल, कल्याण डोंबिवली, मीरा- भाईंदर, वसई- विरार, उल्हासनगर बदलापूर आणि अंबरनाथसारखी शहरे प्रभावित होऊ शकतात. हे देखील वाचा- Nisarga Cyclone: महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 129 वर्षांनंतर जून मध्ये चक्रीवादळ धडकण्याची शक्यता; अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने भारतीय हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा

एएनआयचे ट्वीट-

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान सांगण्यात आले आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून त्यामुले खवळलेला राहणार आहे. उंच लाटा किनाऱ्याला आदळतील. तसेच काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.