Food Poison: लातुर जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमात जेवल्या नतंर २०० नागरिकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. विषबाधेमुळे सर्वांचे प्रकृती बिघडली होती या संदर्भात एका वैद्यकिय अधिकाऱ्याने माहिती दिली. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. ही घटना जिल्ह्यातील देवणी तालुक्यात घडली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी नांदेडमध्ये भगर खाल्ल्याने विषबाधा होऊन ६० नागरिक आजारी पडले होते. हेही वाचा- नांदेड जिल्ह्यात भगर खाल्ल्याने विषबाधा, 60हून अधिक नागरिकांची प्रकृतीत बिघाड
मिळालेल्या माहितीनुसार, देवणी तालुक्यातील वाघनाळवाडी येथील हरिनाम सप्ताह सोहळ्यात ही घटना घडली. कार्यक्रमात पाच वाजताच्या सुमारास भगर देण्यात आली होती. भगर खाल्ल्याने काही वेळाने नागरिकांना उलट्या, मळमळ, चक्कर येऊ लागली त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत अनेकांनी तक्रार केल्या. तात्काळ काही नागरिकांनी उपचारासाठी जवळच्या स्थानिक रुग्णालयत दाखल करण्यात आले. तर काही जणांवर मंदिरातील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ. एच व्ही. यांनी सांगितले की, आता सर्वांवर उपचार करण्यात आले असून परिस्थिती नियत्रंणा बाहेर आहे.
नागपूरमध्ये शिघांड्याचे पीठामुळे विषबाधा
दरम्यान नागपूरमध्ये शिघांड्यांचे पीठ खाल्ल्याने १०० जणांची प्रकृती बिघाडली आहे. नागपूर येथील हिंगणा आणि कामठी तालुक्यातील नागरिकांनी शिघांड्याचे पीठ खाल्ल्याने विषबाधा झाली. वेगवेगळ्या रुग्णालयात नागरिकांवर उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातून ठिकठिकाणी विषबाधा झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.