Aurangabad: औरंगाबादमध्ये व्हिडिओ कॉलवर अज्ञात व्यक्तीने महिलेला दाखवले प्रायव्हेट पार्ट; वाळूज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: pxfuel)

Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. जिल्ह्यातील वाळूज गावातील एका व्यक्तीने महिलेले व्हिडिओ कॉल करत स्वत:चे प्रायव्हेट पार्ट (Private Part) दाखवले. त्यामुळे पीडित महिलेच्या पतीने यासंदर्भात पोलीसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिलेच्या पतीने सांगितले की, या व्यक्तीने माझ्या पत्नीसोबत अश्लील भाषेत आणि लैगिंक संबंधाविषयी चर्चा केली. ही व्यक्ती आमच्या ओळखीची नाही. आम्ही त्या व्यक्तीला ओळखत नाही, असंही पीडितेच्या पतीने सांगितलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. पीडित महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मागील काही दिवसांपासून पत्नीला कॉल करत होता. आम्ही याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, तरीदेखील या व्यक्तीचे फोन येणं बंद झालं नाही. दरम्यान, एक दिवस आरोपीने माझ्या पत्नीला व्हिडिओ कॉल करून त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवले. तसेच लैगिंक संबंध ठेवण्याविषयी बोलू लागला. (हेही वाचा - Maratha Reservation: मराठा आरक्षण मुद्द्यावर कोल्हापूर येथे गोलमेज परिषद आयोजित, येत्या 23 सप्टेंबरला ठरणार आंदोलनाची पुढील दिशा)

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वाळूज पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक सतीश पंडित यांनी सांगितलं की, पीडितेने आरोपीच्या कॉलकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं. परंतु, यानंतरही आरोपीने अनेकदा फोन केले. त्यानंतर काही दिवसांनी तो पीडित महिलेसोबत अश्लील भाषेत बोलला. एक दिवस त्याने व्हिडिओ कॉलमध्ये महिलेला आपले प्रायव्हेट पार्ट दाखवले. त्यानंतर मात्र पीडितेने यासंदर्भात आपल्या पतीला सांगितलं. पीडितेच्या पतीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

वाळूज पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून संबंधित ओरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी पीडित महिलेला ज्या नंबरवरून फोन करण्यात आला होता, त्या नंबरचा तपास करणं सुरू केलं आहे. या मोबाईल नंबरची माहिती मिळाल्यानंतर आरोपीला शोधणं सोपं होणार असल्याचंही पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.