BMC Commissioner Iqbal Chahal (Photo Credit: Twitter)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा (Sushant Singh Rajput Death Case) तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्वपूर्ण निकाल दिला आहे. याव्यतिरिक्त सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. महत्वाचे म्हणजे, सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे एक पथक मुंबईत दाखल होणार आहे. यासाठी मुंबईत येणाऱ्या सीबीआयच्या पथकासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) महत्वाची सूचना केली आहे. जर सीबीआयचे एक पथक 7 दिवसांसाठी मुंबई दाखल झाले तर, त्यांना होम क्वारंटाईनमधून सूट देण्यात येईल. मात्र, सीबीआयचे पथक सात दिवसांहून अधिक काळासाठी मुंबईत येत असतील तर, त्यांना होम क्वारंटाईनमधून सूट मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या इमेल आयडीवर मेल पाठवणे गरजेचे आहे. पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी याआधी बिहार पोलिसांचे एक पथक मुंबई दाखल झाले होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या नियमांतर्गत त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी मुंबई महानगरपालिकेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हे देखील वाचा- Additional Electricity Bill: लॉकडाऊन दरम्यान विजेचे अतिरिक्त बिल आलेल्या ग्राहकांना दिलासा; महाराष्ट्र सरकार भरणार 1 कोटी ग्राहकांचे ज्यादाचे बिल

एएनआयचे ट्वीट-

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर बिहार राज्यात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. बिहारच्या सहरसा जिल्ह्यात लोकांनी फटाके फोडले. आता सुशांतसिंह प्रकरणाचा योग्य तपास होऊन न्याय मिळेल हा विचार करून लोक आनंदी झाले आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.