मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठक (Maharashtra Cabinet Meeting) पार पडली आहे. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून बीडीडी चाळमधील नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या सदनिकांच्या स्टॅम्प ड्युटीचे मुद्रांक 1000 रुपये असणार असून ही रक्कम म्हाडातर्फे भरला जाणार, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. बीडीडी नागरिकांच्या सदनिकांची स्टॅम्प ड्युटी म्हाडा भरणार असणार आहे. याव्यतिरिक्त दूध भुकटी महानंदा, कोरोना व्हायरस यासह अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी म्हटले आहे की, बीडीडी चाळकरांसाठी 1000 रुपयांची स्टॅम्प ठरवण्यात आली आहे. बीडीडी नागरिकांच्या सदनिकांची स्टॅम्प ड्युटी म्हाडा भरणार आहे. सदनिकेमागे महसूलात तूट येत आहे. पण खासकरुन बीडीडीच्या रहिवाशांना सूट म्हणून या प्रकल्पात त्या रुमची/ सदनिकेची नोंदणी 1000 रुपयात करण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा-Mumbai COVID19 Cases Update: मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दोन दिवसानंतर पुन्हा 200 च्या पार गेल्याची BMC ची माहिती
बीडीडी चाळ व्यतिरिक्त लॉकडाऊन काळात उत्पादित दूध भुकटी महानंदला वर्किंग स्टॉक म्हणून उपलब्ध करून देणार आहे. कोरोना संदर्भातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन व कोविड सद्यस्थितीबाबत टीपणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीत पारितोषिकाची रक्कम देणाऱ्या कू आदिती जाधवचे कौतूक करण्यात आले आहे.
सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ओसरत आहे. मात्र, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांना यापुढच्या काळात अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे.