Shyam Manav and Anil Deshmukh | X

कोट्यावधींच्या वसुलीसाठी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर दबाव होता असा गंभीर आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) यांनी केला आहे. नागपूर मध्ये बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठीही अनिल देशमुख यांवर दबाव असल्याचं म्हटलं आहे. अजित पवारांवरही त्यांचा लेक पार्थ पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बोलावून गुटखा व्यवसायिकांकडून दर महिन्याला कोट्यवधींची कमाई करून द्या, अशी मागणी केल्याचं वक्तव्य तपास यंत्रणांकडे द्या, असं सांगण्यासाठी अनिल देशमुखांवर काही लोकांकडून सातत्यानं दबाव टाकला जात होता. असे म्हटलं आहे.

अनिल देशमुखांना ईडीच्या प्रकरणातून सुटण्यासाठी त्यांनी 100 कोटी रूपयांच्या वसुली प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंचं नाव घ्या. आदित्य ठाकरेंवर बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये गुंतवण्याचे आणि अनिल परब यांनाही बेकायदेशीर व्यवहारांमध्ये गुंतवण्यासाठी दबाव टाकण्याची ऑफर होती असा खळबळजनक दावा श्याम मानव यांनी केला आहे.

दरम्यान अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब या तिघांचं नाव घेण्यास नकार दिल्याने अनिल देशमुख यांना 13 महिने तुरुंगात राहावं लागलं, असा दावा श्याम मानव यांनी केला आहे.

अनिल देशमुखांचाही श्याम मानव यांच्या दाव्याला दुजोरा

अनिल देशमुख सध्या शरद पवारांसोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार अनिल देशमुख यांनी या प्रकरणात भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपण करत असलेल्या दाव्यांसाठी आपल्याकडे  पुरावेही आहेत, वेळ आल्यावर मी ते पुरावे सादर करेन, असंही अनिल देशमुख म्हणाले आहेत.

“3 वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझं देवेंद्र फडणवीसांशी अनेकदा बोलणं करून दिलं. त्यांनी माझ्याकडे एक लिफाफा पाठवला. त्यातल्या चार मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्र करून देण्यास मला सांगण्यात आलं. ते जर मी करून दिलं असतं तर तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार अडचणीत आले असते”, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.