Narayan Rane: 'महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा' भाजप नेते नारायण राणे यांचे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र
नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएने अंबानी स्फोटक प्रकरणात अटक केली. स्फोटक असलेली स्कॉर्पिओ अंबानींच्या घराजवळ पार्क करण्याच्या घटनेत वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांकडून राज्य सरकारवर (Maha Vikas Aghadi) टीका केली जात आहे. तर दुसरीकडे, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी भाजपचे नेते नारायण राणे (Narayann Rane) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे केली आहे.

नारायण राणे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले की, 'अमित शहा यांना मी पत्रपाठवून मी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत माहिती दिली. ठाकरे सरकार राज्यातील परिस्थितीत हाताळण्यास अपयशी ठरत असल्याचं निदर्शनास आणून दिले असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भात मी मागणी केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत मी अमित शहांना 3 दिवसांपूर्वी पत्र लिहिले आहे. तसेच सचिन वाझेंना शिवसेनेचा आसरा आहे. सचिन वाझेंच्या जीवावर शिवसेनेवेकडून धमक्या दिल्या जातात. वाझेंची ज्याअर्थी मुंबईत पोस्टिंग होत होती. ते बघता वाझेंचे पोलीस खात्यातील गॉडफादरही आता बाहेर येत आहे', अशी टीकाही राणेंनी शिवसेनेवर केली आहे. हे देखील वाचा- Ambani House Bomb Scare: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ पार्क करून इनोव्हाने पळ काढणाऱ्या संशयित आरोपीने वापरलेली कार मुंबई पोलिसांची, तपासात धक्कादायक खुलासा

मुकेश अंबानींच्या घराजवळ स्कॉर्पिओ गाडीत स्फोटक ठेवल्याच्या प्रकरणात एनआयएने शनिवारी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी केली होती. दरम्यान, तब्बल 13 तास चौकशी केल्यानंतर सचिन वाझे यांना अटक शनिवारी अटक करण्यात आली आहे. या आरोपासह इतर कलमान्वये वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाच्या कटात 5-7 जणांचा समावेश होता. त्यामुळे या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांची देखील चौकशी होऊ शकते, अशीही माहिती समोर येत आहे.