मुंबईकरांना मिळणार दिलासा; आता बेकायदेशीर पार्किंग च्या दंडांची रक्कम होणार कमी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Car Parking Policy Change: मुंबई शहरातील बेकायदेशीर पार्किंगसाठी महापालिकेने दंडाची रक्कम बदलायची ठरवली आहे. नवीन व सुधारित दरांनुसार सार्वजनिक पार्किंग लॉट (पीपीएल) च्या 500 मीटरच्या आत नॉन-पार्किंग झोनमध्ये पार्किंगसाठी दंड 10,000 रुपयांवरून आता 4,000 रुपये करण्यात येणार आहे. बेस्ट डेपोच्या 500 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या बसेसनाही 10,000 रुपयांऐवजी 4,000 रुपये दंड आकारला जाईल.

परंतु एखाद्या चौकात, जिथे बीएमसी 10,000 रुपये घेते दंड आकारात होती तिथे आता 8,000 रुपये bharave लागतील. पीपीएल आणि रस्त्यांच्या लॉटवर पार्किंगसाठी पालिका दररोज 100 रुपये (12 तास) घेते. “नवीन दर या आठवड्यात आणले जातील. हे दर आम्ही पीपीएल आणि स्ट्रीट पार्किंगवरुन वसूल केलेल्या शुल्कावर आधारित आहेत, ”अशी माहिती बीएमसीचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल यांनी मुंबई मिररशी बोलताना दिली आहे.

“पीपीएलमध्ये आम्ही सहा ते बारा तासांसाठी 100 रुपये आणि चौकांजवळ 200 रुपये आकारतो. आम्ही त्या आकडेवारीपेक्षा 40 पट शुल्क आकारत आहोत. या रकमेवर पोहोचण्यापूर्वी आम्ही बरीच गणिते केली की त्यांचा परिणाम काय होऊ शकतो. चौकांजवळ दंड 8,000 रुपये आहे कारण आम्हाला वाहनधारकांना ट्राफिकमुक्त ठेवायचे आहे, असे सिंघल म्हणाले.

एमपीएने अलीकडेच निर्णय दिला आहे की बीएमसीने निवडलेल्या रस्त्यांवर दहा हजार रुपये दंड मनमानी आहे आणि हा निर्णय जनतेवर लादला जाऊ शकत नाही. जुन्या दराच्या काही गुणाने दंड आकारला जावा, असे मुंबई पार्किंग अथॉरिटीचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांनी मनपा आयुक्त प्रवीण परदेशी यांना सांगितले.

खुशखबर! भारतात दाखल होत आहे जगातील सर्वात स्वस्त Electric Car; जाणून घ्या वैशिष्ठ्ये आणि किंमत

केवळ 800 रुपये किंवा 1000 रुपयांपर्यंत दंड कमी केल्याने कोणताही परिणाम झाला नास्ता असे  अधिकाऱ्यांनी सांगितले. “जास्त पार्किंगच्या दंडाचा मोठा परिणाम झाला आहे; रस्ते ट्राफिकमुक्त असतात. लोक आता पीपीएल वापरत आहेत; म्हणूनच आम्ही दंड कमी करण्याचा निर्णय घेतला परंतु तरीही लोकांनी हा नियम पाळावा यासाठी ही रक्कम थोडी जास्तच ठेवली आहे, ”अशी माहिती बीएमसीच्या वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.