कोरोना काळात रुग्णांची सेवा बंद केली तर कठोर कारवाई करू- नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव
Nashik Municipal Corporation | (File Photo)

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही दुप्पट वेगाने आली असून यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकमध्येही कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व घटनांचे साक्षीदार असणारे डॉक्टर्स मात्र हताश झाले असून आपल्याला यातून मुक्त करा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. मात्र कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची सेवा बंद केली तर कठोर कारवाई करू असा इशारा नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांचा खाजगी डॉक्टर्सला दिला आहे. ABP माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हॉस्पिटल ऑनर्स असोसिएशनचा निर्णय ऐकतर्फी आणि चुकीचा आहे. सर्व हॉस्पिटलला महानगरपालिका परवाना देत असते. सेवा देणं हे प्रत्येकाच कर्तव्यच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र देण्याअगोदर स्थानिक प्रशासनाशी चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु कोणतीही चर्चा झाली नाही. आमच्याकडे समस्या न मांडता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आज खाजगी डॉक्टरशी चर्चा करणार तोडगा निघाला नाहीतर कारवाई करणार येईल असेही त्यांनी सांगितले.हेदेखील वाचा- काय सांगता! 'कोरोनामुक्त' असलेल्या गावाला मिळणार मालामाल होण्याची संधी, जाणून घ्या स्पर्धेची पूर्ण माहिती

नाशिकमधील 172 खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी आम्हाला कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी केली आहे. तसेच आम्ही मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या थकलो आहोत, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सध्या कोरोनाचा आलेख उतरणीला लागला असून रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना शायकीय रुग्णालयांत दाखल करण्यात यावं, अशी मागणीही या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात मागील 24 तासांत 15,169 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 285 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 57,76,184 इतकी झाली आहे. तर मृतांची एकूण संख्या 96,751 इतकी झाली आहे.