Eknath Shinde (PC - ANI)

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचा निर्णय तातडीने घेतला आहे. राज्यातील बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS Officer Transfers) पुन्हा एकदा बदल्या करण्यात आल्या आहेत. यात मुंबई, औरंगाबादसारख्या महत्त्वाच्या शहरांसह 20 सनदी अधिकाऱ्यांचा (Officers Transfer Order) समावेश आहे. प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. प्रामुख्याने मुंबई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर याची बदली वैद्यकीय शिक्षण आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून अस्तिमक कुमार पांडे यांची बदली करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे 44 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन काही दिवसच उलटले आहेत. तोपर्यंत राज्य सरकारने पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

विरेंद्र सिंह, मिताली सेठी, सुशील चव्हाण, अजय गुल्हाने,दीपक कुमार मीना, विनय गोवडा, आर.के. गावडे, माणिक गुरसल, शिवराज श्रीकांत पाटील, अस्तिक कुमार पांडे, लीना बनसोड, दीपक सिंगला, एस.एस माळी, एस.सी. पाटील, डी.के खिलारी, एस.के. सलिमनाथ,एस.एम.कुर्तकोटी, राजीव निवतकर, बी.एच पालवे, आ.एस. चव्हाण

प्रशासनातील बदल्या हा नियमीत कामकाजाचा भाग असला तरी, या निर्णयाची आणि बदल्यांची नेमहीच चर्चा होते. अनेकदा राजकीय पक्षांमध्ये बदल्यांवरुन सामनाही रंगलेला पाहायला मिळतो. हा सामना प्रामुख्याने सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा असतो. अनेकदा या बदल्या हा प्रशासकीय निर्णय असला तरी त्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप नेहमीच होत राहतात.