Uddhav Thackeray (Photo Credit: ANI)

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (Citizenship Amendment Act) विरोधात देशभरातून अंदोलन केले जात आहे. तसेच महाराष्ट्राच्या (Maharashtra) अनेक शहरांमध्ये अंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. शांतता आणि सुव्यवस्थेला गालबोल लागेल, असे वागू नका असे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवर्जून सांगितले आहे. तसेच कोणत्याही खोट्या बातम्यांना बळी पडू नका, असेही ते म्हणाले आहेत.

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात महाराष्ट्रातील काही शहरात अंदोलकांनी मोर्चाला हिंसक वळण दिले आहे. महाराष्ट्रातील काही भागात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे तर, काही ठिकाणी वाहनांना पेटवण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता राखावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता आणि सुव्यवस्थेला गालबोल लागेल अशी वर्तणूक करु नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी अंदोलनकर्त्यांकडे केले आहे. महत्वाचे म्हणजे नागरिकांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या संबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या कायद्याच्या नेमका अर्थ काय याची माहिती समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. हे देखील वाचा- Citizenship Amendment Act: परभणीत अंदोलनाला हिंसक वळण; अग्निशमन दलाची गाडी पेटवली

एएनआयचे ट्विट-

कोणत्याही चुकीच्या निर्णयाच्या विरोधात अंदोलन करणे हा नागरिकांचा हक्क आहे. परंतु, कायद्याला धक्का लागणार नाही याची नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केंद्रीय मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.