मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात घडणार्या काही घटनांचा अर्थ लावताना अजित पवार (Ajit Pawar) एनसीपीला (NCP) सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली होती. 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र देखील अजित पवार यांच्याकडे असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण विधानसभेतून बाहेर पडल्यानंतर मीडीयाशी बोलताना त्यांनी 'विनाकारण आपल्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत आणि जीवात जीव असे पर्यंत आपण एनसीपी सोबतच राहणार' अशी प्रतिक्रिया देत भाजपासोबत जाण्याच्या सार्या वृत्तांना पूर्णविराम लावला आहे.
विकासकामांसाठी आपण आज काही आमदारांना भेटलो असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच कोणत्याही आमदाराची सही घेतलेली नाही. बैठक घेतलेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. खातरजमा न करता काही जण बातम्या देत आहेत यावरूनही अजित पवारांनी पत्रकारांना खडसावले आहे. Sharad Pawar On Ajit Pawar: शरद पवार यांनीच सांगितलं अजित पवार यांचे नेमकं चाललंय काय? बंडखोरीच्या वृत्तावर मोठे भाष्य .
महाविकास आघाडीच्या सभांमध्ये प्रत्येक पक्षाकडून 2-2 जण बोलणार असल्याने मागील सभेत आपण बोललो नाही असेही त्यांनी सांगितले आहे.
खारघर घटनेवरून सरकारवर हल्लाबोल
या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसंच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. pic.twitter.com/qRYrh47Txc
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 18, 2023
महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळा दरम्यान 11 श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. त्यावर सरकारने हा कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी किंवा पुरेशी शेड्ची व्यवस्था न करता घेण्यावरून बोल सुनावले आहेत. या प्रकरणी मदत वाढवावी तसेच सरकारच्या ढिसाळ नियोजनावरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाची कारवाई करावी अशा आशयाचं पत्र अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.
अजित पवारांनी त्यांच्याबद्दल उठणार्या वावड्यांवर बोलताना अशा गोष्टींमुळे विनाकारण सामान्य कार्यकर्त्याच्या मनात संभ्रम निर्माण होते. सहयोगी पक्षांसोबतही गैरसमज होऊ शकतात असं बोलून दाखवले आहे.