औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यामध्ये पतीने पत्नीची निर्घृण हत्या (Murder) करून नग्न अवस्थेत मृतदेह फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर या क्रूर पतीने आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला आईच्या मृतदेहाजवळ सोडलं. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. राम बाबूराव काळे, असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. औरंगाबाद पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पतीवर हातोडा किंवा धारधार लोखंडी शस्त्राने वार केले आहेत. तसेच पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा नग्न अवस्थेत मृतेदह फेकून दिला आहे. मृत पत्नीच्या शरीरावर 100 पेक्षा अधिक जखमा आहेत. जयश्री राम काळे, असे मृत महिलेचे नाव आहे. (हेही वाचा - सोलापूर: सुपारी देऊन पोटच्या मुलाची हत्या, बापासह 3 आरोपींना अटक)
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी राम काळे याने अडीच वर्षाच्या लहान मुलाला मृतदेहाजवळ सोडून दिले आणि आपल्या मोठ्या मुलाला घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी मृत महिलेचा मृतदेह जवळच्या स्थानिक रुग्णालयात शवविवच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांना अद्याप खूनाचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस फरार आरोपी राम काळे याचा तपास करत आहेत.