Husband and Wife Argument: माध्यान्ह भोजनास विलंब, संतापाच्या भरात पतीकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या
Kill | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Husband Kills Wife: मध्यान्ह भोजन म्हणजेच दुपारच्या जोवणास विलंब झाल्यामुळे संतापलेल्याएका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील सीतापूर (Sitapur) येथे घडली आहे. दुपारच्या जेवणास उशीर झाल्याने चिडलेल्या पतीने पत्नीची भोसकून हत्या केली. धक्कादायक म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. परसराम असे आरोपीचे नाव असून तो 30 वर्षांचा आहे. तर त्याची पत्नी प्रेमा देवी 28 वर्षांची आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शेतकरी असलेल्या या कुटुंबात घडलेल्या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

उत्तर प्रदेश राज्यातील सीतापूर येथील ठाणगाव पोलिस स्टेशनचे एसएचओ हनुमंत लाल तिवारी यांनी माहिती देताना सांगितले की, परसराम आणि त्याची पत्नी प्रेमा देवी हे शेती करतात. परसराम नेहमीप्रमाणे शेतात गेला होता. दुपारच्या वेळी शेतातून घरी आलेल्या परसराम याला कथीतरित्या भूक लागली होती. त्यामुळे त्याने पत्नीकडे जेवण मागितले. मात्र, पत्नीने दुपारचे जेवण अजूनही तयार नाही. त्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असे तिने सांगितले. पत्नीचे उत्तर ऐकूण पती परसराम प्रचंड चिडला. त्यातून त्याच्यात आणि पत्नीशी वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. त्यातून पतीने परसराम याने पत्नीवर चाकूने वार केले. घाव वर्मी लागल्याने आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Uttar Pradesh Crime: भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीची हत्या, सहारनपूर येथील थरारक घटना)

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पत्नीची हत्या केल्यानंतर पतीला तुरुंगात जाण्याची भीती वाटू लागली. त्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्या केली. पत्नीची हत्याकेल्यानंत तो सैरभैर झाला. त्याला काहीच न सूचल्याने त्याने स्वत:ला घरातील खोलीत कोंडून घेतले. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीचा आणि पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे. (हेही वाचा, https://cmsmarathi.letsly.in/india/banda-murder-case-man-murder-wife-up-police-investigate-501567.html)

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, परसराम आणि प्रेमादेवी यांचे काही काळापूर्वीच लग्न झाले आहे. दोघांमध्ये विविध कारणांवरुन सातत्याने भांडणे होत असत. भांडणाचे स्वरुपही हिंसक असे. त्यांच्यातील सतत्या वादामुळे शेजारीही वैतागले होते. दरम्यान, त्यांचे भांडण इतक्या विकोपाला केव्हाही गेले नव्हते. मात्र, घटना घडली त्या दिवशी सकाळी दोघांमध्ये काही कारणांवरुन वाद निर्माण झाला होता. त्यानंतर परसराम शेतात गेला आणि दुपारी घरी परतला. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि ही घटना घडली.