म्हाडाचे घर (MHADA House) मिळावे यासाठी तुम्ही जर विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरु शकते. सुरु असलेले वर्ष सरते आहे. हे वर्ष सरले की पुढच्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात तुम्हाला एक गोड बातमी मिळू शकते. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जानेवारी 2022 (MHADA Lottery 2022) मध्ये म्हाडाची लॉटरी (MHADA Lottery) निघणार असल्याचे आव्हाड म्हणाले. म्हाडाच्या नव्या प्रकल्पांबाबत काय विचार आहे. तसेच, म्हाडाची पुढची लॉटरी कधी निघणार आहे याबाबत प्रसारमाध्यमांनी जितेंद्र आव्हाड यांना विचारले होते. या वेळी प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते.
मुंबईसारख्या महाकाय शहरात आपले एखादे घर असावे अशी प्रत्येक मुंबईकराची इच्छा असते. मात्र, वाढती महागाई, शहरातील जागांचे वाढलेले गगनचुंबी भाव या सर्वामुळे मंबईत घर घेणे सर्वासामान्यांच्या आवाक्याबाहेरचे होऊन बसले आहे. त्यामुळे जर स्वत: सरकारनेच पुढाकार घेऊन जर घरे बांधली आणि ती घरे नागरिकांना उपलब्ध करुन दिली तर मात्र मुंबईसारख्या शहरात सर्वसामान्य नागरिकांना घरे मिळू शकतात. (हेही वाचा, MHADA Lottery 2021 Update: म्हाडा चं Konkan Board यंदा दसर्याच्या मुहूर्तावर जाहीर करणार 9000 घरांसाठी सोडत)
म्हाडा हे प्रचलित नाव आहे. म्हाडाचा पूर्ण नाव असा की, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ज्याचे इंग्रजी नाव Maharashtra Housing and Area Development Authority असे आहे. इग्रजी नावाचा शॉर्टफॉर्म MHDA असा केला आहे. महाराष्ट्र सरकारने म्हाडा या संस्थेची स्थापना 5 डिसेंबर 1977 राजी केली. म्हाडा महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ व मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ ह्या चार सरकारी संस्थांचे विलिनीकरण करुन झाले आहे. म्हाडाने आजवर हजारो घरं बांधली आहे.