महाराष्ट्रातील सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा (Mangalvedha) तालुक्यातील नंदेश्वर (Nandeshwar) गावात हॉटेल व्यावसायिकाच्या दोन बहिणी आणि सुनेची हत्या (Murder) झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महादेव माळी असे हॉटेल मालकाचे नाव आहे. याप्रकरणी नंदेश्वर गावातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली माळी, पारुबाई माळी आणि संगीता माळी अशी मृत महिलांची नावे आहेत. आरोपींनी तीन महिलांची दगडाने वार करून हत्या केली. महादेव माळी यांच्या आईचे पूर्वी निधन झाले होते.
आईच्या निधनानंतर महादेव माळी, संगीता माळी व पारुबाई माळी या दोन्ही बहिणी आईच्या अंत्यसंस्कारासाठी नंदेश्वर येथे आल्या होत्या. मंगळवारी दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान महादेव माळी व त्यांचा मुलगा काही कामानिमित्त घराबाहेर पडले होते, त्याचवेळी संधीचा फायदा घेत आरोपीने घराबाहेर कपडे धुत असलेल्या बहिणीवर कोयत्याने वार केले. हेही वाचा Raipur Shocker: लग्नाच्या रिसेप्शनपूर्वी नवविवाहित जोडप्याचा संशयास्पद मृत्यू, तपास सुरू
बहिणीवर हल्ला होत असल्याचे पाहून घरात उपस्थित असलेल्या इतर बहिणीने व महादेव माळी यांच्या सून यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी दोघांवरही दगडफेक केली. या तिन्ही महिलांच्या हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या तिन्ही महिला घरासमोर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्याने त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांनाही उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. या संपूर्ण घटनेदरम्यान घरात उपस्थित असलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचला आहे.