Chief Minister Ajit Pawar (PC - Twitter)

कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. आज पुण्यातील विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अजित पवार यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदीं अधिकारी उपस्थित होते. (हेही वाचा - Coronavirus Updates: मुंबईतील धारावीत आज COVID19 चे आणखी 10 रुग्णांची भर पडल्याने आकडा 1899 वर पोहचला, मुंबई महापालिकेची माहिती)

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणं व दुसरीकडे सार्वजनिक व्यवहार सुरळीत करून अर्थचक्राला गती आणणं, हे आपल्यासमोरचं आव्हान आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करून हळूहळू अर्थचक्राला गती देणं आवश्यक आहे. याकामी नागरिकांनी शिस्त पाळणं आवश्यक असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. (नागपूरजवळील आदासा येथील कोळसा खाणीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन)

दरम्यान, ससून रुग्णालयासाठी मनुष्यबळ तसचं तातडीच्या साधनसामुग्रीच्या दृष्टीनं मंत्रालय स्तरावर असलेल्या प्रस्तावाना मंजुरी देण्यात येईल. यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधी तातडीनं देण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी अजित पवार यांनी स्त्राव तपासणी क्षमता, पॉझिटिव्ह रुग्ण संख्या स्थिती, वॉर्डनिहाय रुग्ण संख्या, कंन्टेनमेंट झोननिहाय स्थिती, संस्थात्मक क्वारंटाईन क्षमता, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, शाळा सुरू करण्यापूर्वी तसचं शाळा सुरू झाल्यानंतरची काळजी, उपचार सुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेतला.