देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव (Coronavirus) वेगाने वाढत आहे. त्यामुळे येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊन 5.0 चा टप्पा कायम राहणार असल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. परंतु लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात काही नियम शिथील करत गोष्टी Unlock नुसार सुरु करण्यास ही परवानगी दिली आहे. याच दरम्यान आता कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत असलेल्या मुंबईतील धारावीत (Dharavi) आज कोरोनाचे नवे 10 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील आता एकूण कोविड19 च्या रुग्णांचा आकडा 1899 वर पोहचला असून आतापर्यंत 71 जणांचा बळी गेल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाचा वेग संथ झाला असला तरीही त्याची साखळी तुटली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. तसेच नागरिकांनी आता घराबाहेर पडताना स्वत:ची काळजी घ्यावी आणि खासकरुन जेष्ठ नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी सुद्धा अहोरात्र काम करुन रुग्णांवर उपचार करत आहेत. दुसऱ्या बाजूला पोलीस दलातील कर्मचारी रस्त्यावर गस्त घालून आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता तरी सुजाण नागरिकांसारखे वागावे अशी अपेक्षा केली जात आहे.(औरंगाबाद मध्ये 90 नव्या Coronavirus रुग्णांसह जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1936 वर)
Ten fresh cases of #COVID19 recorded in Dharavi area of Maharashtra's Mumbai today, taking total number of cases to 1899. 71 people have succumbed to the disease in the area so far: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) June 6, 2020
महाराष्ट्रात शुक्रवारी 139 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात 2436 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 80,229 वर पोहचला आहे. आतापर्यंत एकूण 2849 जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून 35,156 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.