मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या 12 उपायुक्तांच्या बदल्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्याकडून स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भात अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे.
दरम्यान, गृह विभागाने गुरुवारी शंकर शिंदे, परमजीत सिंग दहिया, डॉ. रश्मी करंदीकर, संग्रामसिंग निशाणदार, प्रशांत कदम, शहाजी उमप, मोहन दहीकर अशा 12 उपायुक्तांच्या बदलीचे आदेश काढले होते. परंतु, त्यास केवळ 3 दिवसात स्थगिती देण्यात आली आहे. या बदल्यांवरून आधीच राजकारण तापलं आहे. याशिवाय विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी यावरून महाविकास आघाडी सरकारवर टिका केली आहे. (हेही वाचा - राज्यातील हॉटेल-लॉज लवकरच सुरु करण्याचा विचार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा)
@CPMumbaiPolice ने केलेल्या मुंबईतील अंतर्गत बदल्यांना मुख्यमंत्री @OfficeofUT व माझ्या ऑफिस कडून स्थगिती देण्यात आली आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 5, 2020
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 'दोन दिवसात डीसीपीच्या बदल्या थांबवून दाखवल्या,' असं म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
करून दाखविले!!! २ दिवसात १२ डी सी पी चा बदल्या थांबवून दाखविल्या. २ कि. मी. चा बाहेर जाता येणार नाही थांबवून दाखविले, ४००० कोरोना मृत्यू लपवून दाखविले.... उद्धवा गजब तुझा कारभार @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/2p56baK79K
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 5, 2020
गृह मंत्रालय ने 10 DCPs के ट्रांसफ़र किए थे 2 जुलाई को।
आज कैंसल कर दिए।क्यों? कोई कारण नहीं बताया गया।
राज्य प्रशासन के इतिहास में ऐसा पहली बार हुआ है।
Its ‘New Normal’ in the new government in Maharashtra.
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) July 5, 2020
याशिवाय काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीदेखील उपायुक्तांच्या बदल्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टिका केली आहे. 'गृह मंत्रालयाने 2 जुलै रोजी 10 डीसीपींची बदली केली होती. आज रद्द केली. का? कोणतेही कारण दिले गेले नाही. राज्य प्रशासनाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्राच्या नवीन सरकारचे हे नवीन आणि नॉर्मल आहे,' असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.