Hingoli Risod National Highway Accident: हिंगोली येथील रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोन तरुणाचा जागीच मृत्यू
Accident News PC PIXABAY

Hingoli Risod National Highway Accident: हिंगोली येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील राहुली पाटीजवळ घडला. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकाचा अपघात झाला. यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अपघातस्थळी येऊन तपासणी सुरु केली. पोलिसांनी अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करून घेतला आहे. (हेही वाचा- भरारी पथकाची मोठी कारवाई! मध्यरात्रीत भांडूपमधून ४ हजार ६५० कोटींचा मुद्देमाल जप्त)

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव पाटील आणि शुभम पारसकर अशी अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहे. सांयकाळी साडे सातच्या दरम्यान हा अपघात घडला. दोघे जण दुचाकीवर खासगी काम आपटून घरच्या दिशने जात होते. हिंगोलीच्या त्र्यंबकनाका राहुली पाटी परिसरात आले तेवढ्याच एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. वाहन इतक्या वेगात आली की, दुचाकीच्या धडकेत दोघे ही जमीनीवर पडले. दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. वाहन चालक अपघातस्थळावरून फरार झाला.

अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.अपघातस्थळी पोलिस आले त्यांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. दोघांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती देण्यात आली. हिंगोली ग्रामी पोलिसांकडून वाहन चालकाचा शोध सुरु आहे. अपघातात दुचाकीचे संपुर्ण नुकसान झाले. दोघांच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबियांनी माहिती दिली की,  खाजगी कामानिमित्त हिंगोली वरून सेनगाव शहरात गेले होते.