Mumbai Police | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Mumbai Crime News: निवडणूक आयोग (Election Commission) च्या भरारी पथकाकडून धडक कारवाया केल्या जात आहे. महाराष्ट्रात गेल्या 44 दिवसांत 40 कोटींची रक्कम पकडली गेली. यात 69.38 कोटींचे मौल्यवान धातू जप्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय,35 लाख लिटर दारुसह 79.87 कोटींच्या अन्य वस्तू असा .431.34कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. आता शनिवारी 27 एप्रिल रोजी मध्यरात्री भांडूप (Bhandup) मध्ये मोठी कारवाई झाली आहे. भांडूप येथील सोनापूर सिग्नलवर कॅशने भरलेली वाहन नाकाबंदी दरम्यान पकडण्यात आली. त्यात तब्बल तीन ते साडे तीन कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. (हेही वाचा :Lok Sabha Election 2024: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी )

भांडूप येथील सोनापूर सिग्नलवर 27 मार्च रोजी रात्री एकच्या सुमारास नाकाबंदी सुरू होती. यावेळी निवडणूक भरारी पथकाने एक वाहन पकडले. त्या वाहनात तीन ते साडे तीन कोटी रुपयांची रक्कम होती. ही रोकड रक्कम सध्या भांडूप पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. पोलीस स्टेशनमध्ये आयकर विभागाचे पथकाने याची दाखल घेतली आहे.

ही रक्कम कुठे नेली जात होती? ती रक्कम कोणाची आहे? यासंदर्भात काहीच उत्तरे गाडी चालकाने दिली नाही. यामुळे हा प्रकार नेमका काय याचा तपास पोलिस करत आहेत. आचारसंहिता सुरु असताना हा प्रकार उघड झाल्यामुळे खळबळ माजली आहे.