प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: IANS/File Photo)

Mumbai High Tide 15th July 2020:  मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान हवामान खात्याने मुंबई सह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला सध्या ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार सतत कोसळणार्‍या पावसामुळे आज मुंबई चिंब झाली आहे. मुंबईमध्ये हिंदमाता, किंग्ज सर्कल परिसरामध्ये सखल भागात पाणी तुंबले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आले आहे. साचलेल्या पाण्यात किंवा समुद्रकिनारी आज न जाण्याचं आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. तसेच मुंबई मध्ये आज संध्याकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी 3 .28 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. Maharashtra Monsoon 2020 Updates: मुंबई, ठाणे, पालघर येथे आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी.

आजपासून पुढचे 2 दिवस मुंबई, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

गेल्या 24 तासात, डहाणू 128 mm, कुलाबा 121.6 mm,सांताक्रुज‌ 96.6 mm, रत्नागिरी 101., miअलिबाग 122.6 mi इतका पाऊस झाल्याने नागरिकांनी काळजी घ्या असं आवाहन मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी केले आहे. Mumbai Rains: जुलै महिन्यासाठी अपेक्षित 100 टक्के पाऊस पहिल्या 14 दिवसातच पूर्ण, पहा आकडेवारी.

मुंबई महानगर पालिकेचे नागरिकांना आवाहन

मुंबई प्रमाणेच पावसाचं कोकणामध्येही धुमशान सुरूच आहे. अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत असल्याने पूर सदृश्य स्थिती अनुभवायला मिळाली आहे. मागील दरम्यान हा पाऊस कोकणासह राज्यभरातील शेतकर्‍यांना फायदेशीर ठरणार असल्याने बळीराजाला येत्या काही दिवसात कोसळणारा हा पाऊस सुखावह आहे.