![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/05/555238278be680640d8f02870b670711-1-380x214.jpg)
Maharashtra Weather Updates: मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाल्याने आज पुन्हा एकदा मुंबई (Mumbai) सह ठाणे (Thane), पालघर (Palghar) या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या भागात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जावू नये असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत कालपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर कोकणातही मागील काही दिवसांपासून धुव्वाधार पाऊस बरसत आहे. आज सकाळपासूनच मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान 16 जुलै पर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र , मराठावाडा येथील बहुतांश भागांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र घाट भागात, कोकण, गोवा मध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; हवामान विभागाकडून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन)
K S Hosalikar Tweet:
And some more warnings on,https://t.co/eAIy8vhJfG pic.twitter.com/xHUDNSxdZz
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 14, 2020
मुंबईत जुलै महिन्यात 840.7mm इतका पाऊस पडणे अपेक्षित असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 506.4 mm इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस जुलै महिन्यात अपेक्षित असलेल्या पाऊसाइतका आहे. दरम्यान यंदा समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसह सामान्यही अगदी आनंदात आहे.