Rainfall (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा सक्रीय झालेल्या मान्सूनने (Monsoon 2020) जोरदार हजेरी लावली आहे. उद्या बुधवार 15 जुलै रोजी कोकोण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची (Heavy Rainfall Likely In Konkan) शक्यता आहे. यामुळे हवामान विभागाने (IMD) मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यासांठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

दक्षिण कोकणामध्ये मागील काही दिवसांपासून धुव्वाधार पाऊस बरसत आहे. मुंबई मध्ये मात्र अधून मधून पावसाची मोठी सर बरसून जाते. सध्या पश्चिम कोकण किनारपट्टीवर वार्‍याचा वेग वाढला असून परिणामी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने त्यांच्या अंदाजपत्रकामध्ये स्पष्ट केला आहे. यामुळे हवामान विभागाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. कोकणामध्ये, गोव्यामध्ये सध्या भाताची शेती सुरू आहे. दमदार पाऊस हा भातशेतीसाठी पुरक असल्याने आता पश्चिम किनारपट्टीवरील शेतकर्‍यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. हे देखील वाचा- Maharashtra Monsoon 2020 Upadate: 15 जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघर येथे मुसळधार पावसाची शक्यता; मुंबई हवामान विभागाचा अंदाज

ट्वीट-

 

मुंबईत मागील 24 तासांत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मुंबईत जुलै महिन्यात 840.7mm इतका पाऊस पडणे अपेक्षित आहे. आत्तापर्यंत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 506.4 mm इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा पाऊस जुलै महिन्यातील 60% पाऊसा इतका आहे.