Mumbai-Pune Expressway: उन्हाचा पारा वाढला! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुढचे तीन दिवस अवजड वाहनांना बंदी
Mumbai Pune Expressway Traffic | (Photo Credit - Twitter)

Mumbai Pune Expressway : वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळेस वाहने चालवणे धोकादायक झाले आहे. दुपारच्या वेळेस इंजिन गरम होणे (Engines over heating), वाहने पेट घेणे (vehicles catching fire), ईव्ही बॅट्रीजचा स्फोट होणे (EV batteries exploding) अशा घटना घडत आहे. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी (Highway Police) वाहचालकांना कोणताही धोका होऊ नये यासाठी काही सुचना जारी केल्या आहेत. ज्यात उद्यापासून (शनिवार, ता. 6 एप्रिल) मंगळवार (ता. 9 एप्रिल) पर्यंत अवजड वाहनांना मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणा-या लेनवर बंदी घातली आहे. ही बंदी सध्या तरी फक्त ३ दिवस असणार आहे. (हेही वाचा :Mumbai Heat wave: मुंबईत तापमान 40 अंशांपेक्षा पुढे जाण्याचा धोका, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन )

उन्हाचा पारा चाळीस अंश पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर वाहनांचे टायर गरम होऊन फुटण्याची शक्यता असते. तसेच वाहनांचे इंजिन गरम होऊन वाहन पेट घेण्याची शक्यता असते. या घटनांमुळे बोरघाटात वाहतूक नेहमी ठप्प होते. या घटना टळाव्यात यासाठी महामार्ग पोलिसांकडून या उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहनांना सहा एप्रिल ते नऊ एप्रिल पर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणा-या लेनवर बंदी घालण्यात आली आहे.

त्यामुळे महामार्ग पोलिसांकडून अवजड वाहन मालक, चालक संघटनांना शनिवार ते मंगळवार पर्यंत अवजड वाहनं पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आणू नयेत याची काळजी घ्यावी.