Thane Rain PM TWITTER

Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसाने रविवारच्या पहाटेपासून  हजेरी लावली आहे.  ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने काही भागात पाणी साचले आहे. ठाणे शहरातील काही भागात झाडाच्या फांद्या कोसळून रस्त्यावर पडल्या आहेत. रविवारी सकाळी 8.30 वाजता ठाण्यात 36.06 मिमी इतका पाऊस पडला आहे. ठाण्यातील मुसळधार पावासामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. कोकण विभागात पावसाने थैमान घातले आहे.  (हेही वाचा- मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी)

रविवारी पहाटे 12.30 ते 1.30 वाजता ठाण्यात 16.76 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. नंतर पहाटे 3.30 ते 4.30 वाजता 10.93 मिमी इतका पावसाची नोंद केली आहे अशी माहिती ठाणे महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन ताडवी यांनी दिली. ठाण्यातील काही भागात पाणी साचले आहे.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. वाहतुक सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहने हळूहळू चालत आहे.

मुसळधार पावसाने पालघर शहराला झोडपले आहे.पालघर शहरात ठिकाठिकाणी पाणी साचले आहे.  ठाण्यात आज मुसळधार पाऊस असणार आहे. त्यामुळे नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. राज्यात पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कडक उष्णतेपासून सुटका मिळाली आहे.