ग्रामपंचायत निवडणुकीचा (Gram Panchayat Election) धुरळा गावागावांत उडला आहे. अनेक गावांत शह-काटशह आणि डावपेच पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी दिलजमाईचे तर काही ठिकाणी संघर्षाचे वातावरण आहे. काही ठिकाणी मात्र दुख:द घटना पाहायला मिळत आहेत. लातूर जिल्ह्यातील मुरुड ग्रामपंचायत (Murud Gram Panchayat Election) निवडणुकीतही अशीच दु:खद घटना घडली. अमर पुंडलीक नाडे यांनी आपल्या पॅनलसाठी घरोघरी जाऊन प्रचार केला आणि प्रचारसभेतही तडाकेबंद भाषण केले. त्यांची पत्नीही निवडणुकीत उमेदवार आहे. त्यामुळे त्यांनी पत्नी आणि पॅनलसाठी भाषणात मते मागितली. दरम्यान, भाषण संपताच ते खुर्चीवर जाऊन बसले ते परत उठलेच नाहीत. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू (Heart Attack Video) झाला.
अमर पुंडलीक नाडे हे अमृता अमर नाडे यांचे पती आहेत. अमृता नाडे या मुरुड ग्रामपंचायत सरपंच पदासाठी निवडणुकीत उमेदवार आहेत. त्यांनी आपले स्वतंत्र पॅनल लावले आहे. अमर यांनी पॅनलसाठी काल (14 डिसेंबर) जोरदार प्रचार केला. तसेच, आयोजित सभेत जोरदार भाषण केले. दरम्यान, भाषण संपवून सभेदरम्यान ते खुर्चीवर बसले तिथेच त्यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या निधनामुळे अवघ्या गावावर शोककळा पसरली आहे.
व्हिडिओ
#Latur : 25 मिनिटं भाषण केलं, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुलत्याच्या विरोध पॅनल उतरवलेल्या व्यक्तीचा भाषणानंतर स्टेजवरच मृत्यू, लातूर जिल्ह्यातल्या मुरुड गावातील दुर्दैवी घटना, हे शब्द बोलून ते बसले आणि मृत्यूने त्यांना कवटाळलं (VC : महेंद्र जोंधळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी) pic.twitter.com/TTQUN7chRs
— Siddhesh Sawant (@ssidsawant) December 15, 2022
मुरुड ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वीच गावावर शोककळा पसरली आहे. अमर नाडे हे गावातील तरुण व्यवसायीक आहेत. या आधी ते ग्रामपंचायत सदस्यही राहिले आहेत. शिवाय अष्टविनायक शिक्षण संस्थेचे तो अध्यक्षही होते. वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षीच निधन झाल्याने गावाने एक तरुण आणि होतकरु व्यक्तीमत्व हरवल्याची भावना व्यक्त होत आहे. भाषण संपवून खाली बसल्यावर आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याची माहती त्यांनी शेजारीच बसलेल्या पत्नीला दिली. मात्र, काही हालचाल करेपर्यंत ते खुर्चीवरुन खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.