Haji Ali Dargah च्या वेळेत आगामी 3 दिवस समुद्राच्या भरतीमुळे वेळांमध्ये बदल; पहा वेळापत्रक

मुंबईच्या वरळी (Worli) भागात असलेल्या हाजी अली दर्गाला (Haji Ali Dargah) भेट देण्यासाठी बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर बदललेलं वेळापत्रक जाणून घ्या आणि बाहेर पडा. दरम्यान आज 3 मे, मंगळवार Eid-al-Fitr च्या निमित्ताने आणि पुढील 2 दिवस दर्गाच्या वेळेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल समुद्राला उधाण येणार असल्याने करण्यात आले आहे. हाजी अली दर्गा हा मुंबईमध्ये पर्यटकांसाठी एक आकर्षणाचा भाग आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांसोबतच अनेक्क पर्याटक, इतर धर्मीय नागरिक, पर्यटक हाजी अली दर्गाला आवर्जुन भेट देण्यासाठी येतात. सुट्टीच्या दिवशी या भागात मोठी गर्दी असते.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हाजी अली दर्गा आज ईदच्या दिवशी दुपारी 12.30 ते 3 या वेळेत दर्गा भाविकांसाठी बंद असेल. त्यानंतर बुधवार, 4 मे दिवशी दर्गा 1.15 ते 3.30 या वेळेत बंद राहणार आहे तर गुरूवार 5 मे दिवशी दर्गा 2 ते 4 या वेळेत बंद राहणार आहे.

दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीतून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दर्गाच्या अथॉरिटीकडून घेण्यात आली आहे. सध्या दर्गाबाहेर पोलिसांचा मोठा सुरक्षेचा फौजफाटा देखील लावण्यात आला आहे. पुढील 3 दिवस हा पोलिसांचा प्रवेशद्वारापाशी बंदोबस्त असणार आहे. हे देखील नक्की वाचा: Eid Mubarak: 2 वर्षांनंतर देशभर रमजान ईदचा उत्साह; मशिदींमध्ये सार्वजनिकरित्या नमाज अदा .

यंदा कोविड 19 चे निर्बंधामधून सार्‍यांची सुटका झाली असल्याने पहिल्यांदा निर्बंधमुक्त वातावरणामध्ये ईद साजरी होत आहे. मुंबईतही आह अनेक दर्गांमध्ये सामुहिक नमाज पठण करण्यात आले आहे.