Hailstorm in Vidarbha, Marathwada | (Photo Credits-Twitter)

कोरोना व्हायरस महामारी, लॉकडाऊन अशा संकटातून सावरत असतानाच मराठवाडा (Marathwada), विदर्भातील शेतकऱ्यांवर आता पुन्हा एकदा नैसर्गिक संकट कोसळले आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये (Vidarbha) मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसासह गारपीट (Hailstorm in Vidarbha, Marathwada) झाली आहे. गारपीठीमुळे शेतात उभ्या असलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, कापूस, तूर, कांदा यांसारख्या पिकांचे नुकसान झाले. तर, मोसंबी, डाळींब यांसारख्या फळबागांही मोठाच फटका बसला. प्रामुख्याने नागपूरसह, अकोला, अमरावती, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये अवकाळी आणि गारपीठीचा अधिक फटका बसल्याची माहिती आहे.

विज कोसळून दोन ठार

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील नावेगाव धुसारा शिवार परिसरात वीज कोसळून नयन पुंडे नावाचा एक अल्पवयीन मुलगा (वय वर्षे 12) ठार झाला. तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथेही विज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Crop Damage In Maharashtra: पावसामुळे महाराष्ट्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; तब्बल 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांना फोन)

नागपूर, यवतमाळला गारपीठीने झोडपले

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीठ झाली. गणोरी, बाभूळगाव शहर, आसेगाव राणी अमरावती परिसरातही मोठी गारपीठ पाहायला मिळाली. नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर, नरखेड तालुक्यात तालुक्यांता गारा आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मोहपा, वाढोना आणि मेंढला येथेही मोठ्या प्रमाणावर गारपीठ झाल्याचे नागरिक सांगतात.

ट्विट

औरंगाबादमध्ये गारांचा पाऊस

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारांचा पाऊस झाला. या गारपीठीचा प्रामुख्याने वैजापूर, गंगापूर तालुक्याला फटका बसला. त्यामुळे तूर आणि कांदा पिकांना मोठा फटका बसला. या भागात गारपीठ होईल असा इशारा हवामान विभागाने आगोदरच दिला होता. गारीपीट आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची महसूल विभागाकडून माहिती घेतली जात आहे.