Nawab Malik | Photo Credits: Twitter/ ANI and Pixabay

मुंबई मध्ये काल (17 मार्च) 24 तासांत कोरोना बाधितांची संख्या 2000 च्या पुढे गेल्याने प्रशासन अ‍ॅक्शन मोड मध्ये गेले आहे. दरम्यान राज्य सराकर अद्याप मुंबई मध्ये लॉकडाऊनच्या विचारामध्ये नाही पण नागरिकांनी सहकार्य करणं आवश्यक असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटल्याचं ANIचं वृत्त आहे. सोबतच नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसर राज्य सरकार कडून काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबत बोलताना मुंबईच्या Haffkine Institute मध्ये लस निर्मितीला परवानगी मिळावी तसेच वयाचं, सहव्याधींचं बंधन झुगारून आता राज्यात 45 वर्षावरील सार्‍यांनाच कोरोनाची लस देण्यास मुभा मिळावी अशा दोन आग्रहाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळेस त्यांनी स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सिन लसीच्या आधारे मुंबई मध्येही Haffkine Institute ला लस निर्मिती करता यावी यासाठी 2 पर्याय सुचवले आहेत. या विचारामध्ये सकारात्मक पावलं उचलली जातील असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला आहे. Coronavirus Vaccine वरून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये वाद; प्रकाश जावडेकर यांच्या टीकेला राजेश टोपे यांचे प्रत्युत्तर.

ANI Tweet

कोरोना संकटासोबतच सध्या महाविकास आघाडी सरकार मनसुख हिरेन आणि अंबानीच्या घराजवळ स्फोटकं सापडणं या दोन प्रकरणांमुळे चर्चेमध्ये आहे. अ‍ॅड्मिनिस्ट्रेटिव्ह निर्णय म्हणून मुंबईच्या पोलिस आयुक्तांच्या बदलीचे काल निर्णय घेण्यात आले आहे. सचिन वाझे मुळे पोलिस खात्याची प्रतिमा डागाळली जात आहे. त्यामुळे त्यावर ठोस निर्णय घेताना बदली करणं आवश्यक असल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत.