Rajesh Tope, Prakash Javadekar (Photo Credit: ANI/ PTI)

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाला (Coronavirus Vaccine) सुरुवात झाली आहे. राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात जेष्ठ आणि अन्य आजार जडलेल्या 45 ते 59 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला असून केंद्राकडे आणखी लशीची मागणी केली आहे. मात्र, या मागणीवरून केंद्रीय आरोग्यमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच राज्याकडे आधीचा साठा शिल्लक असल्याचे ते म्हणाले आहेत. जावडेकर यांच्या टीकेला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज बैठक पार पडली आहे. या बैठकीत राजेश टोपे हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात वेगाने लसीकरण सुरु आहे. यामुळे राज्याला 20 लाखांची लशी मिळाव्यात, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. परंत, यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांकडून महाराष्ट्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. तसेच राज्याकडे लशीचा साठा उरलेला आहे, असेही बोलले जात आहे. जर 3 लाख लस देण्याचे नियोजन केले आहे. तर, राज्याकडे केवळ 10 दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे, असेही राजेश टोपे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- मुंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीनंतर किरीट सोमय्या, आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजप नेत्यांच्या प्रतिक्रीया

ट्वीट-

नुकतीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी त्यांना महाराष्ट्रातील लशींच्या साठ्याबाबत विचारले असता ते म्हणाले आहे की, प्राप्त झालेल्या एकूण कोविड लसींपैकी 56 टक्के लस महाराष्ट्राने वापरलेल्या नाहीत. आम्हाला लस कमी दिल्या जातात, असे सांगून महाविकास आघाडी सरकार राजकारण करीत आहे, असेही फडणवीस म्हणाले आहेत.