महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. परंतु इतर राज्यातून येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे (Dilip Walase Patil) पाटील यांनी दिले आहे. प्रतिबंधित पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनामार्फत पोलिस विभागाच्या सहाय्याने करण्यात येते. परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा अवैध पद्धतीने राज्यात आणून त्याचे वितरण आणि विक्री केली जाते. यासाठी अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिस विभागाने संयुक्तपणे मोहिम राबवावी.
महाराष्ट्रात #गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु, इतर राज्यांतून येणारा #गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री @Dwalsepatil यांनी दिले. pic.twitter.com/CFnaPFHBDH
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 25, 2021
गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात गृहमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव संजय सक्सेना, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, सहसचिव दौलत देसाई, यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (हे ही वाचा Mumbai Water Taxi: नववर्षात मुंबईकरांच्या सेवेत 'वॉटर टॅक्सी'; मुंबई ते नवी मुंबई वेगवान जलप्रवास.)
पोलिस यंत्रणांनी या सर्व अन्नपदार्थांची उत्पादन, विक्री, साठवणूक, वितरण व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अधिक दक्ष राहून प्रभावीपणे कारवाई करावी. तसेच प्राप्त तक्रारीची तातडीने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिले.