Mumbai Water Taxi: नववर्षात मुंबईकरांच्या सेवेत 'वॉटर टॅक्सी'; मुंबई ते नवी मुंबई वेगवान जलप्रवास
Water Taxi | (Photo Credit: Archived, edited, representative images)

मुंबईकरांचा मुंबई ते नवी मुंबई (Mumbai to Navi Mumbai) हा प्रवास पुढील वर्षात ( New Year 2022) अगदी जलद होणार आहे. विशेष म्हणजे हा प्रवास जलमार्गे होणार असून, त्यासाठी 'वॉटर टॅक्सी' (Mumbai Water Taxi) सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा जलप्रवास (Water Voyage) आता अधिक गतिमान होणार आहे. येत्या 16 डिसेंबरपासून मुंबई ते नवी मुंबई या जलमार्गावर वॉरट टॅक्सी (Water Taxi) सेवा सुरु होणार आहे. त्यासाठी दोन्ही बाजूला जट्टी तयार करुन ट्रायल रनही घेण्यात आली आहे. आजघडीला मुंबईकरांना नवी मुंबई ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक रेल्वे प्रवास आणि दुसरा रस्तेप्रवास. आता यात जलप्रवासाचीही भर पडणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या वेळेत बचत होईल. शिवाय रस्त्यावरील ट्रॅफीकवरही तोडगाड निघू शकणार आहे.

वॉटर टॅक्सीचा वापर वाढल्यास मुंबईकरांचा इंधनावर होणार खर्च, तसेच रस्तेवाहतुकीत होणारी वाहतुक कोंडी, रेल्वेतील गर्दी आणि इतर बऱ्याच त्रासांपासून सुटका होऊ शकणार आहे. प्राप्त माहितीनुसार, मुंबई ते नवी मुंबई हा जलप्रवास वॉटरटॅक्सीने केल्यास तो अवघा 40 मिनीटांचा आहे. वॉटर टॅक्सीबाबत बोलताना मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन राजीव जलोटा यांनी सांगिते की, मुंबईतील डोमेस्टीक क्रूज टर्मिनल प्रवाशांच्या स्वागतासाठी तयार आहे. या मार्गावर वॉटर टॅक्सी पुरवणारी सेवा कंपनीही निवडली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, मुंबईकरांसाठी जलप्रवासाकरिता सज्ज झालेल्या UberBOAT ची सेवा लांबणीवर)

नवी मुंबईतून मुंबई शहरात कामधंदा आणि नोकरीसाठी दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखांच्या घरात आहे. त्यामुळे या प्रवाशांच्या सेवेसाठी सुखकर मार्ग निवडण्याचे प्रयत्न पाठीमागील प्रदीर्घ काळापासून सुरु होते. साधारणपणे एकूण 12 मार्गांवर वॉटर टॅक्सी तर 4 मार्गावर रोपेक्स सेवा सुरू करण्याबाबत योजना आखणे सुरु आहे. ही योजना प्रत्यक्षात उतरु शकल्यास येत्या काळात हा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.