प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

मुंबईकरांना 1 फेब्रुवारी पासून उबरद्वारे मोबाईलच्या एका क्लिकवर अवघ्या काही मिनिटांतच स्पीड बोट वाहतूकीचा आनंद घेता येणार असल्याचे सांगतिले गेले. तसेच गेटवे ऑफ इंडिया (Gateway Of India) ही उबर बोट सेवा सुरु करण्यात येणार आहे. उबर कडून नेमकी कधी सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही प्रवाशांना जलवाहतूकीचा आनंद घेता येईल असे उबकरडून सांगण्यात आले. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे सुरु करण्यात येणारी बोटसेवा लांबणीवर गेली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सुरूवातीला गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा (Gateway-Mandwa Jetty )असा प्रवास करण्याची सोय देण्यात येणार आहे. पुढे भविष्यात ही सोय अलिबागपर्यंत आणि नवी मुंबई ते दक्षिण मुंबई अशीदेखील केली जाईल असे सांगण्यात आले होते. मुंबईत सुरु होणाऱ्या या बोटचे भाडे 5700 रुपये असणार आहे. तसेच सहा ते आठ जण बसू शकतील अशी व्यवस्था या बोटमध्ये करण्यात आली आहे. (हेही वाचा-मुंबईकरांसाठी लवकरच उबर घेऊन येणार UberBOAT सेवा, स्पीडबोटने अवघ्या काही मिनिटात गाठू शकणार मांडवा, अलिबाग, एलिफंटा)

सहा जणांसाठी बुकिंगची सोय उबर अ‍ॅपच्या माध्यमातून उबर बोटसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. गरजेनुसार तुम्हांला संपूर्ण स्पीडबोटदेखील बुक करता येणार आहे. प्रवासाच्या किमान 15 मिनिटं आधी ही बोट बुक करण्याची सोय देण्यात आली आहे.