Urad Dal (Photo Credits : Facebook)

राज्यात हरभरा आणि उडीद डाळ यांचे भाव वाढवले असून त्याचा फटका आता सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यामुळ हरभरा प्रति किलो 40 व उडीज डाळ 55 रुपये प्रति किलो या वाढीव किंमतीने बाजारात विकली जाणार आहे.

हरभरा आणि उडीद डाळीसाठी 1100 टन मागणी बाजारात करण्यात आली आहे. तर सरकारने दिवाळीच्या वेळी हरभरा 35 रुपये प्रति किलो आणि उडीद डाळ 55 रुपये प्रति किलोने देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे सरकारने ठरवून दिलेल्या दराचा फटका सर्वसामान्यांना बसणार असल्याने दुकानदारांनी ती न उलचण्याचा निर्णय घेतला होता.

ऐन दिवाळीच्या वेळी सरकारने पुरेशा प्रमाणात दुकानदारांना डाळी उपलब्ध करुन दिल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संताप दिसून आला. त्यात आता पुन्हा सरकारने डाळींचे भाव वाढविल्याने याचा फटका सर्वसामान्यांना तर बसणारच आहे. त्यातसोबत दुकानदार सरकारच्या या निर्णयावर काय पावले उचलणार याची शंका बाळगली जात आहे.